**CLICK HERE** डॉ. जयंत नारळीकर Online Quiz
**CLICK HERE** डॉ. जयंत नारळीकर Online Quiz
डॉ. सी. व्ही.रमण बालवैज्ञानिक परीक्षा 2026 , नाव नोंदणी सुरु , परीक्षा साधारणत: फेब्रुवारी/मार्च २०२७ मध्ये होईल .
पारितोषक वितरण व कार्यशाळा ऑगस्ट २०२६ महिन्याच्या शेवटी होईल .
Registration of Dr. C. V. Raman Balvaidnyanic Exam Started , Tentative Exam Date : In February/ March 2027
स्वतः भोवती घडणाऱ्या अनेक घटना लहान मुले बारकाईने पाहत असतात व त्याचे त्यांना फार कुतूहल वाटत असते, हे कसे घडते ? याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात तयार होत असतात.
आकाश निळेच का दिसते ?
सूर्य उगवताना आणि मावळताना लाल का दिसतो ?
पानांचा रंग हिरवाच का ?
रिमोट द्वारे खेळणी कशा चालतात ?
जिज्ञासा पोटी घडणाऱ्या घटनांच्या मागील कार्यकारण भाव समजावून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना सहजपणे उपलब्ध होतीलच असे नाही.
आज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न...
विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी यंदा आम्ही नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असे ऑनलाईन स्टडी मटेरियल अगदी नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून दिले आहे. हे मटेरियल मिळविण्यासाठी Register for Online Study Material असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करा. फॉर्म भरून नोंदणी केल्यावर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड एसएमएसने आणि इमेलने पाठविला जाईल. तो वापरून Online Study Material - Login असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करून लॉगीन करा. हे ऑनलाईन स्टडी मटेरियल आपल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त आहेच; परंतु याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासासाठीसुद्धा नक्की होईल.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी अभिरुची, संशोधक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
विद्यार्थ्यांमध्ये प्रायोगिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी तसेच प्रकल्प निर्माण करण्यासाठी सुटे साहित्य उपलब्ध करू देणे.
विद्यार्थांच्या निरीक्षण व अवलोकन क्षमतेला वाव.
शास्त्रज्ञांचा प्रेरणात्मक जीवनांचा परिचय.
बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करू देणे.