आमच्याविषयी

संशोधनात्मक वृत्ती वाढवणारा उपक्रम

स्वतः भोवती घडणाऱ्या अनेक घटना लहान मुले बारकाईने पाहत असतात व त्याचे त्यांना फार कुतूहल वाटत असते, हे कसे घडते ? याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात तयार होत असतात.

आकाश निळेच का दिसते ?
सुर्य उगवताना आणि मावळताना लाल का दिसतो ?
पानांचा रंग हिरवाच का ?
रिमोट द्वारे खेळणी कशा चालतात ?
जिज्ञासा पोटी घडणाऱ्या घटनांच्या मागील कार्यकारण भाव समजावून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना सहजपणे उपलब्ध होतीलच असे नाही.

आज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न...

उद्दिष्टे :

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी अभिरुची, संशोधक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
विद्यार्थ्यांमध्ये प्रायोगिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी तसेच प्रकल्प निर्माण करण्यासाठी सुटे साहित्य उपलब्ध करू देणे.
विद्यार्थांच्या निरीक्षण व अवलोकन क्षमतेला वाव.
शास्त्रज्ञांचा प्रेरणात्मक जीवनांचा परिचय.
बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करू देणे.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये :

डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्राचे डॉ. आनंद घैसास यांनी विद्यार्थ्यांना हसत-खेळत प्रयोग शिकविले व प्रयोग करून घेतले.
पुणे विद्यापीठ व एल. जी. कंपनीच्या फिरत्या विज्ञान शाळेद्वारे निदेशकांच्या मार्गदर्शनाखाली 5०० बाल वैज्ञानिकांनी सुट्ट्या साहित्त्यापासून उपकरणे तयार करून त्यांना ती घरी देण्यात आली.
पुणे विद्यापीठ व एल. जी. कंपनीच्या फिरत्या प्रयोगशाळेच्या विज्ञान नाटिकेद्वारे अनेक संकल्पनांचे निरसन करण्यात आले.
डॉ. एस. आय. पाटील समन्वयक, फिरती विज्ञान प्रयोगशाळा यांनी मुलभूत संशोधनातील संधी व भावी करिअरविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ.सी.व्ही.रमन बालवैज्ञानिक कार्यशाळेसाठी लाभलेले प्रमुख मान्यवर

डॉ. सी. व्ही. बालवैज्ञानिक कार्यशाळा २०१९
मा.डॉ. श्रीनिवास औंधकर (संचालक, डॉ.ए.जे.अब्दुल कलाम खगोल अंतराळ केंद्र, औरंगाबाद)
मा.श्री. प्रतिक पाटील (शास्त्रज्ञ, इस्त्रो)
मा. श्री. संचित जाधव (असि. कमांडट,सीआयएसएफ)
मा. डॉ.एस.आय. पाटील (प्र. कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ)
मा. डॉ. संजय ढोले (विज्ञान कथाकार व समन्वयक फिरती विज्ञान प्रयोगशाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. श्री. रामदास हराळ (शिक्षणाधिकारी, जि. प. अहमदनगर)
मा. श्री. शिरीष जाधव (कृषी उपसंचालक, रत्नागिरी)
मा. श्री. दत्तात्रय आरोटे (सचिव, राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ)

डॉ. सी. व्ही. बालवैज्ञानिक कार्यशाळा २०१८
मा. डॉ. पंडित विद्यासागर (कुलगुरू, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
मा.श्री. प्रतिक पाटील (शास्त्रज्ञ, इस्त्रो)
मा. श्री. संचित जाधव (असि. कमांडट,सीआयएसएफ)
मा. डॉ.एस.आय. पाटील (प्र. कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ)
मा. डॉ. संजय ढोले (विज्ञान कथाकार व समन्वयक फिरती विज्ञान प्रयोगशाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. डॉ. आर.एस. वाघ (सचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी)
मा. श्रीम. साईलता सामलेटी (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, संगमनेर)

डॉ. सी. व्ही. बालवैज्ञानिक कार्यशाळा २०१७
मा.डॉ. अरविंद नातू (वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयसर, पुणे)
मा. डॉ.एस.आय. पाटील (प्र. कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ)
मा. डॉ. संजय ढोले (विज्ञान कथाकार व समन्वयक फिरती विज्ञान प्रयोगशाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. डॉ. सुनिल म्हस्के (अधिष्ठाता, डॉ. पदमश्री विखे पाटील मेडिकल कॉलेज,अहमदनगर)
मा. श्री. आनंद बनसोडे (एव्हरेस्टवीर)
मा. श्री. आर. पी. अवसारे (राज्य विज्ञान संस्था, नागपूर)
मा. श्री. लक्ष्मीप्रसाद मोहिते (अध्यक्ष, जिल्हा विज्ञान संघटना, सोलापूर)

डॉ. सी. व्ही. बालवैज्ञानिक कार्यशाळा २०१६
मा. डॉ. सुरेश नाईक (समूह संचालक, इस्त्रो)
मा. डॉ. के. पी. विश्वनाथा (कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
मा. श्री. श्रीकांत सुसे (जिल्हाधिकारी, जम्मू व काश्मीर)
मा. डॉ.एस.आय. पाटील (विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. डॉ. संजय ढोले (विज्ञान कथाकार व समन्वयक फिरती विज्ञान प्रयोगशाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

डॉ. सी. व्ही. बालवैज्ञानिक कार्यशाळा २०१५
मा. डॉ. आरती पाटील (नासा ट्रेनर)
मा. डॉ.एस.आय. पाटील (विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. डॉ. संजय ढोले (विज्ञान कथाकार व समन्वयक फिरती विज्ञान प्रयोगशाळा,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मा. श्री. अण्णासाहेब गि-हे (दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी, राहुरी)
मा. श्री. रणजित देशमुख (प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय माद्यामिक शिक्षा अभियान, मुंबई)
मा. श्री. मिलिंद ढोके (विद्यापीठ अभियंता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
मा. श्री. बाळासाहेब धनवे (गट शिक्षणाधिकारी)
मा. डॉ. दत्ता पोदे (संचालक, सिनर्जी सायन्स अकॅडेमी, अहमदनगर)

डॉ. सी. व्ही. बालवैज्ञानिक कार्यशाळा २०१४
मा. डॉ. व्यकंटेश गंभीर (सल्लागार, सोलापूर विज्ञान केंद्र तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई)
मा. श्री. अनंत तांबे (जिल्हाधिकारी)
मा. डॉ.एस.आय. पाटील (विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. डॉ. संजय ढोले (विज्ञान कथाकार व समन्वयक फिरती विज्ञान प्रयोगशाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. श्री. संतोष बनकर (तहसीलदार)
मा. श्री. कृष्णकुमार पाटील (सचिव, महाराष्ट राज्य माद्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. पुणे)
मा. श्री. रुपेश गोमासे (रिजनल को- ऑडीनेटर, आयआरआयएस, नागपूर)

डॉ. सी. व्ही. बालवैज्ञानिक कार्यशाळा २०१३
मा. श्री. सुरेंद्र कुलकर्णी (टाटा इन्स्टिट्यूट, मुंबई)
मा. श्रीम. ज्योती कावरे (उपजिल्हाधिकारी, अहमदनगर)
मा. डॉ.एस.आय. पाटील (विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. डॉ. संजय ढोले (विज्ञान कथाकार व समन्वयक फिरती विज्ञान प्रयोगशाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. श्री. भिमराव उल्मेक (अधिष्ठाता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
मा. श्री. हरी मोरे (संचालक विस्तार शिक्षण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
मा. श्री. दादासाहेब गिते (तहसीलदार, राहुरी)
मा. श्री. दत्तात्रय आरोटे (सचिव, राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ)

डॉ. सी. व्ही. बालवैज्ञानिक कार्यशाळा २०१२
मा. डॉ. तुकाराम मोरे (कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
मा. डॉ.एस.आय. पाटील (विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा. डॉ. संजय ढोले (विज्ञान कथाकार व समन्वयक फिरती विज्ञान प्रयोगशाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मा.श्री. शेषराव बडे (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती श्रीगोंदा)
मा. श्री. व्ही. डी. काळे (सचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी)

डॉ. सी. व्ही. बालवैज्ञानिक कार्यशाळा २०११
मा. डॉ. आनंद घैसास (विज्ञान प्रसारक, डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई)
मा. श्री. सुभाषचंद्र येवले (जिल्हाधिकारी, मुंबई)
मा. श्री. दिनेश निसंग (आकाश निरीक्षक, पुणे)
मा. श्री. सुधाकर कु-हाडे (पक्षी निरीक्षक, पुणे)
मा. श्री. विपूल पाटनी (आयआयटी, मुंबई)